२६/11 करून शेकडो निरपराध लोकाना अतिरेक्यानी ठार मारले... अनेक शहरात आतापर्यंत हजारो लोकाना प्राण गमवावे लागले... अतिरेकी बोंबस्पॉट करून पसार होतात पण जे हातात येतात आणि ज्यांच्यावर खटला भरून शिक्षा होते.. ते ही सुरक्षित राहतात.
अफ़ज़ल या अतिरेक्याला फाशीची शिक्षा होउन सुधा ७ वर्षानंतर देखील सरकारच्या बेपर्वाईने तो अजून जिवंत आहे....
मुंबईवरील २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी कसाब याच्या सुरक्षेसाठी सरकार किती रूपये खर्च करतेय, याची कल्पना आहे... ? काही लाख रूपये असा तुमचा
अंदाज असेल तर जरा नीट लक्ष द्या... इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनी कसाबच्या संरक्षणापोटी सरकारकडे दिलेल्या बिलाची रक्कम आहे १० कोटी रूपये... !
हा केवळ सुरक्षेचा खर्च असून, कसाबला पोसण्यासाठी सरकार कोट्यवधी रूपये खर्च करतेय, याची
कल्पना यावरून सहज येईल. (http://maharashtratimes.indiatimes.com/...)
सामान्य जनतेचे जीवन एवढे स्वस्त आहे की कोणीही कुठून ही यावे आणि स्पॉट करून
मारावे..भारतीय लोकाशाहिच लक्तारे ज़ाहिर ज़गासमोर काढावित. आणि सापडले की वर
राष्ट्रपतिकडे दयेची भिक मागावी. यालाच आता लोकशाही म्हणावे ? की कायदा हातात घेउन अतिरेक्याना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे ??? अफ़ज़ल ला ज़र लवकर फाशी दिली नाही तर जनतेचा लोकशाही वरचा विश्वास उडेल हे सरकारने ध्यानात घ्यावे..!!
~अफजल गुरू , कसाब ला फाशी ~
तुम्हीही तुमची मतं, तुमचे विचार ... इथे लिहू शकता.
"जय हिंद."
!! वंदे मातरम !!
Regards:-
India Against Terrorism
