
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/epapermain.aspx?edcode=256
कसाब जिवंत पकडला गेला नसता तर नरसंहाराच्या (मुंबईवरील 26/11चा अतिरेकी हल्ला) कटात बाहेरच्या शक्ती (पाकिस्तान) सहभागी होत्या याची माहिती मिळणे शक्य नव्हते. देशातील लोकांनीच हे काम केल्याची शंका कायम राहिली असती. राज्य सरकारच्या वकिलांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली.
न्यायमूर्ती आफताब आलम आणि सी.के. प्रसाद यांच्या पीठासमोर माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रहमण्यम राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडत होते. सुरुवातीपासून हा खटला लढणारे विशेष सरकारी वकील उज्जवल निकमही त्यांच्यासोबत होते. या प्रकरणात झालेल्या फाशीच्या शिक्षेला अजमल आमिर कसाबने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.
या वेळी वकिलांनी सांगितले की, मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला होता. रक्तपातासाठी पाठवण्यात आलेल्या 10 अतिरेक्यांपैकी पहिली हत्या झाली ती कसाबच्याच हातून. भारतीय नौका कुबेरच्या नाविकाचे धड त्याने शिरापासून वेगळे केले होते. कसाब आणि त्याचे साथीदार कुबेरमधूनच समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. त्याचे नाविक अमरसिंह सोळंकी यांची हत्या केल्याची कबुली कसाबने दिली आहे. 166 लोकांचे बळी घेणार्या हॉटेल ताज, ओबेरॉय, सीएसटी, छाबड हाऊस येथे झालेल्या या हल्ल्यात कसाब हा एकमेव जिवंत हाती लागलेला अतिरेकी आहे.
INDIA AGAINST TERRORISM

No comments:
Post a Comment